महाराष्ट्रात 70 टक्के लसीकरण झालं तर तिसऱ्या लाटेची दाहकता कमी जाणवेल : आरोग्यमंत्री राजेश टोपे
मुंबई : राज्यात मागील दोन दिवस कोरोनाची रुग्णसंख्या काहीशी वाढली होती. मात्र आज राज्यात कालच्या तुलनेत रुग्णसंख्या तीन हजारने कमी झाली आहे. राज्यात आज 6727 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 10 हजार 812 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. आतापर्यंत एकूण 58 लाख 925 रुणांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्याचा रिकव्हरी रेट 95.99 टक्के झाला आहे. सध्या राज्यात 1 लाख 17 हजार 864 अॅक्टिव रुग्ण आहेत.