ABP News

Health Minister Rajesh Tope On Mask : मस्ट म्हणजे आवाहन, सक्ती नव्हे, आरोग्यमंत्र्यांचं स्पष्टीकरण

Continues below advertisement

Maharashtra Corona Outbreak : देशासह राज्यात पुन्हा एकदा कोरोनानं चिंता वाढवली आहे. कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर प्रशासन अलर्ट मोर्डवर आहे. केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण (Rajesh Bhushan) यांनी तामिळनाडू, केरळ, तेलंगणा, कर्नाटक आणि महाराष्ट्र (Maharashtra) या राज्यांना कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सतर्क राहून योग्य त्या उपाययोजना करण्यासंदर्भात पत्र लिहिलं आहे. त्यांनी महाराष्ट्रातील वाढत्या कोविड-19 रुग्णसंख्येबाबत चिंता व्यक्त केल्यानंतर अवघ्या काही तासांतच सार्वजनिक आरोग्य अतिरिक्त मुख्य सचिव प्रदीप व्यास (Dr. Pradeep Vyas) यांचं पत्र समोर आलं आहे. वाढत्या कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यांना  लक्ष ठेवण्याच्या आणि योग्य त्या उपाययोजना करण्याच्या सूचना या पत्रातून देण्यात आल्या आहेत.  

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram