परीक्षा रद्द झाल्याची शुक्रवारी घोषणा, आज उमेदवारांना शुभेच्छा देणार जाहिरात! Health Department चा पराक्रम
पुणे : आरोग्य विभागाची परीक्षा ऐनवेळी रद्द झाल्याने लाखो विद्यार्थ्यांना प्रचंड त्रासाला सामोरं जावं लागलंय. मात्र हे पहिल्यांदाच घडलेलं नाही. अशाप्रकरचा गोंधळ या आधी अनेकदा वेगवेगळ्या परीक्षांमध्ये आणि भरती प्रक्रियांमध्ये पाहायला मिळालाय. मात्र तरीही या गोंधळांना कारणीभूत ठरणाऱ्या त्याच त्या खाजगी कंपन्यांना परीक्षा घेण्याची कंत्राट दिलं जातं. त्यामुळं सरकारच्या हेतूंबद्दलच विद्यार्थी शंका उपस्थित करू लागलेत.