Akola पुरामध्ये 30-35 जनावरं वाहून गेली, ढगफुटीसदृश पाऊस, खानापूर गावात पूरस्थिती
Continues below advertisement
अकोला जिल्ह्यातील पातूर तालूक्यात गेल्या चोवीस तासांत ढगफुटीसदृष्य पाऊस झालाय. या पावसामुळे पातूर तालूक्यातील अंधारसांगवी, चोंढी, खानापूर परिसरात मोठे नुकसान झालं. काल संध्याकाळी चोंढी परिसरात निर्गुणा नदीच्या पुरात 25 जनावरे वाहून गेली. मात्र, सुदैवानं ही सारीच जनावरं पुरातून बाहेर निघाल्यानं वाचलीत. तर पातूर शहरालगतच्या खानापुर गावात नाल्याच्या पुराचे पाणी घुसल्याने गावाला अक्षरश: तलावाचे स्वरूप प्राप्त झाले.
Continues below advertisement