ABP Majha Headlines : एबीपी माझा हेडलाईन्स : 7AM : 7 March 2024 : Maharashtra News
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppABP Majha Headlines : एबीपी माझा हेडलाईन्स : 7AM : 7 March 2024 : Maharashtra News
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज काश्मीर दौऱ्यावर, कलम ३७० हटवल्यानंतर पहिल्यांदाच श्रीनगर दौरा, ठिकठिकाणी कडेकोट सुरक्षाव्यवस्था
नवी दिल्लीतील भाजपच्या मुख्यालयात महाराष्ट्रातील नेत्यांची बैठक, फडणवीस, दानवे, मुनगंटीवार यांची अमित शाह, जेपी नड्डा, बीएल संतोष यांच्यासोबत चर्चा
भाजपची महाराष्ट्रातील उमेदवारांची यादी लांबणीवर, ८ मार्चला मोदींच्या आसाम दौऱ्यामुळे भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीची बैठक आता १० मार्चला
उमेदवारांची नावं निश्चित करण्यासाठी आज काँग्रेस निवडणूक समितीची पहिली बैठक, १०० लोकसभा मतदारसंघांवर चर्चा, विद्यमान खासदारांना पुन्हा संधी मिळण्याची शक्यता
उमेदवारांची दुसरी यादी निश्चित करण्यासाठी भाजपच्या कोअर कमिटीची आज बैठक, रात्रीच्या बैठकीत तब्बल १५० जागांवर चर्चा, रविवारी शिक्कामोर्तब
मनसेच्या १८ व्या वर्धापन दिनानिमित्त राज ठाकरे तीन दिवस नाशिक दौऱ्यावर, तर नाशिकमध्ये भावी मुख्यमंत्री अशा आशयाचे बॅनर
आज पुणे महापालिकेचा अर्थसंकल्प, पुणेकरांना कोणत्या योजनांसाठी किती निधी मिळणार, करवाढ होणार का याकडे पुणेकरांचं लक्ष
नागपुरातील खापरखेडा औष्णिक विद्युत केंद्राचा एक संच बंद, कर्मचाऱ्यांच्या संपामुळे ५०० मेगावॅटचा संच बंद पडल्याचा कृती समितीचा दावा, प्रशासनानं दावा फेटाळला
भारत आणि इंग्लंडमध्ये आज अखेरचा कसोटी सामना, मालिकेत ३-१ नं भारत आधीच आघाडीवर, आर आश्विनचा १००वा कसोटी सामना