Headlines 7 07 PM TOP Headlines 07 PM 15 October 2024

Continues below advertisement

एबीपी माझा हेडलाईन्स 07 PM टॉप हेडलाईन्स 07 PM 15 ऑक्टोबर 2024 

विधानसभा निवडणुकीचं रणशिंग फुंकलं,२० नोव्हेंबरला मतदान तर २३ नोव्हेंबरला मतमोजणी, ३९ दिवसांत आटोपणार निवडणूक...

निवडणुकीची घोषणा होताच फडणवीसांकडून एक्सवर व्हिडीओ पोस्ट, 'शंखनाद' कॅप्शन देत फडणवीसांकडून निवडणूक तयारीची घोषणा..तर जनता २ वर्षातील कामांची पोचपावती देईल, मुख्यमंत्र्यांचा विश्वास

निवडणूक जाहीर होताच मनोज जरांगेंचा फडणवीसांवर हल्लाबोल.. मराठा समाजासोबत फडणवीस द्वेषाने वागलेत आता लोकसभेपेक्षा जास्त ताकद दाखवून विधानसभेला सुपडा साफ करणारच, जरांगेंचा इशारा

महाराष्ट्रात एकाच टप्प्यात निवडणूक होतेय, आता एकाच टप्प्यात कार्यक्रम होणार, राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांचा महायुतीला टोला

पिपाणी चिन्ह हटवण्याची शरद पवारांच्या पक्षाची मागणी निवडणूक आयोगाकडून अमान्य..पण तुतारी चिन्हाचा आकार वाढवणार...

महायुतीच्या जागावाटपावर आजच शिक्कामोर्तब होण्याची शक्यता, निवडणुकीची घोषणा होताच राजकीय हालचालींना वेग.. रात्री वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांची बैठक

 

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram