सकाळी 6.30 च्या हेडलाईन्स ABP Majha Marathi News Headlines 6.30AM TOP Headlines 6.30 AM 21 Dec 2024

Continues below advertisement

सकाळी 6.30 च्या हेडलाईन्स ABP Majha Marathi News Headlines 6.30AM TOP Headlines 6.30 AM 21 Dec 2024

भाजप आमदार आणि जिल्हाध्यक्षांची आज नागपुरात बैठक, नवीन सरकार आल्यानंतर भाजपची पहिलीच बैठक, आगामी स्थानिक स्वराज्य निवडणुकीच्या अनुषंगाने बैठकीचं आयोजन.

शरद पवार आज बीड आणि परभणीचा दौरा करणार. यावेळी बीड मधील सरपंच कुटुंबीयांची सांत्वन पर भेट घेत, परभणीतील सुर्य़वंशी कुटुंबीयांची देखिल भेट घेणार...

बीडमधल्या सरपंच हत्याप्रकरणी वाल्मिक कराडवरून जितेंद्र आव्हाडांचा धनंजय मुंडेंवर हल्लाबोल...तर चौकशी करा, दूध का दूध पानी का पानी होऊ दे, धनंजय मुंडेंचं उत्तर...

खासदार संजय राऊतांच्या भांडुपमधील बंगल्याची अज्ञातांकडून रेकी,  आमदार सुनील राऊतांचा आरोप...तर मोबाईल नेटवर्क चाचणीसाठी कर्मचाऱ्यांच्य़ा फेऱ्या, पोलिसांची माहिती

माजोरड्यांचा माज उतरवणार, कल्याणमधील मराठी कुटुंबाच्या मारहाणीवरुन फडणवीसांची विधानसभेत ग्वाही...आरोपी अखिलेश शुक्लाला अटक...जुन्या वादाला भाषेचा मुद्दा बनवल्याचा शुक्लाचा आरोप...

अधिवेशन संपल्यानंतर खातेवाटपाची शक्यता...नाराजीनाट्य उफाळून येऊ नये यासाठी महायुतीचा सावध पवित्रा, सूत्रांची माहिती...२३ तारखेला मंत्री संभाव्य खात्यांचा घेऊ शकतात चार्ज...

रोहित पवारांनी घेतली अजितदादांची भेट... फडणवीसांनी मुख्यमंत्री होण्याच्या शुभेच्छा दिल्यानंतर रोहित पवारांकडूनही काकांचं अभिनंदन

नागपूरच्या सीताबर्डी परिसरात माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या समर्थनात बॅनरबाजी. सात वेळा आमदार असताना देखील मंत्री म्हणून का डावललं, बॅनरवर लिहिला मजकूर

सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये पुढील दोन दिवस कांद्याचे लिलाव बंद राहणार, माथाडी कामगारांनी माल उचलला नसल्याने आज लिलावासाठी कांदा बाजारात आणला जाणार नाही.

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram