Hashim Musa kashmir Jungal : जिहादी दहशतवादी हशिम मुसा जंगलात लपल्याची माहिती
Hashim Musa kashmir Jungal : जिहादी दहशतवादी हशिम मुसा जंगलात लपल्याची माहिती
22 एप्रिलला जम्मू काश्मीरमधील पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी हल्ला (Pahalgam Terror Attack) केला होता. यानंतर भारताने पाकिस्तानविरोधात कठोर पावलं उचलण्यास सुरुवात केली आहे. भारत आणि पाकिस्तानमध्य सध्या तणावाची स्थिती आहे. याच पार्श्वभूमीवर, एअर चीफ मार्शल अमर प्रीत सिंग (Air Chief Marshal Amar Preet Singh) यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. यामध्ये हवाई दलाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचाही समावेश असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. पाकिस्तानसोबतच्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर ही बैठक महत्त्वाची मानली जात आहे. शनिवारी, नौदल प्रमुख अॅडमिरल दिनेश के. त्रिपाठी यांनी पंतप्रधानांची भेट घेतली होती.
शनिवारी, नौदल प्रमुख अॅडमिरल दिनेश के त्रिपाठी यांनी पंतप्रधान मोदींची त्यांच्या लोक कल्याण मार्गावरील निवासस्थानी भेट घेतली होती. काही दिवसांपूर्वी पंतप्रधान मोदींच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीनंतर हवाई दल प्रमुख आणि पंतप्रधान मोदी यांच्यातील ही बैठक झाली. त्या बैठकीला संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, संरक्षण प्रमुख (सीडीएस) जनरल अनिल चौहान आणि तिन्ही सशस्त्र दलांचे प्रमुख उपस्थित होते. त्या बैठकीत राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार (NSA) अजित डोभाल देखील उपस्थित होते.