Hasan Mushrif | चंद्रकांत पाटलांनी केवळ माझा काटा काढण्यासाठी बँकेची चौकशी लावली : हसन मुश्रीफ

कोल्हापूर : राज्य सहकारी बँक घोटाळा प्रकरणी उपमुख्यमंत्री अजित पवार, हसन मुश्रीफ यांच्यासह 65 संचालकांना दिलासा मिळाला आहे. सहकार विभागाच्या अहवालामध्ये अजित पवार यांच्यासह 65 संचालकांना क्लिन चिट देण्यात आली आहे. यापूर्वी एसआयटीनेही अजित पवार यांच्यासह राज्य सहकारी बँकेवरील 75 जणांना क्लीन चीट दिली होती. यानंतर आता मंत्री हसन मुश्रीफ यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.

हसन मुश्रीफ म्हणाले की, मुळात महाराष्ट्र राज्य बँकेचा हा घोटाळा नव्हताच. मी बँकेच्या एकही बैठकीला उपस्थित नव्हतो, तरीही चंद्रकांतदादा पाटील यांनी माझं नाव घातलं. चंद्रकांत पाटील यांनी केवळ माझा काटा काढण्यासाठी बँकेची चौकशी लावली. पृथ्वीराज चव्हाण यांनी केवळ 88 लावली, मात्र त्याच्या चौकशीसाठी अधिकारी चंद्रकांत पाटील यांनी आणले. सत्ता असताना भाजपमध्ये अनेक नेते गेले होते. मी चंद्रकांतदादांना म्हणालो होतो ही सत्तेचं सूज आहे. आता ती सूज आता कमी व्हायला सुरुवात झालीय, असं मुश्रीफ यांनी म्हटलं आहे. ये तो झांकी है, पिक्चर अभी बाकी है! असं म्हणत त्यांनी टोलाही लगावला. ते म्हणाले की, कोरोनाची दुसरी लाट येत आहे, नागरिकांनी काळजी घेणं गरजेचं आहे. जो कोणी मास्क घालणार नाही त्याला दंड ठोठावला पाहिजे, असं देखील मुश्रीफ म्हणाले.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola