Harshwardhan Patil : तुतारी हातात, इंदापूर टप्प्यात? हर्षवर्धन पाटलांचा भाजपला दे धक्का

Continues below advertisement

भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांचा शरद पवारांच्या राष्ट्रवादीतला प्रवेश निश्चित झालाय.. ६ किंवा ७ तारखेला हर्षवर्धन पाटील तुतारी फुंकणार आहेत..
आज पवारांच्या मुंबईतल्या सिल्व्हर ओक या निवासस्थानी हर्षवर्धन पाटलांनी शरद पवारांची भेट घेतली... हर्षवर्धन पाटील यांचे चिरंजीव राजवर्धन पाटील आणि मुलगी अंकिता पाटील यांनी त्यांच्या व्हॉट्स अॅप स्टेटसला तुतारी चिन्ह ठेवलंय... 

पुणे : महायुतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार (Ajit pawar) यांच्या पक्षाचा सहभाग झाल्यामुळे भाजप नेते आणि माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांची चांगलीच गोची झाली आहे. कारण, महायुतीमधील नियमाप्रमाणे विद्यमान आमदाराची जागा त्या त्या पक्षाला सुटणार आहे. इंदापूरचे आमदार दत्तात्रय भरणे यांनी निवडणुकांसाठीच्या प्रचारालाही सुरुवात केली आहे. त्यामुळे, हर्षवर्धन पाटील यांच्या उमेदवारीची शक्यता मावळली असून त्यांनी तुतारी हाती घेण्याचं निश्चित केलंय. आता, पुढील 4 ते 5 दिवसांत हर्षवर्धन पाटील (Harshwardhan Patil) तुतारी हाती घेत शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याचे स्पष्ट झालं आहे. हर्षवर्धन पाटील यांनी आजच शरद पवारांची भेट घेतली असून त्यांच्या लेकीने स्टेटवर तुतारी वाजवणार माणूस हे चिन्ह ठेवल्याचं दिसून आलं. 

"आमचा स्वाभिमान आमचे विमान, आमचं आता ठरलंय, तयारी लागा", अशा आशयाचे बॅनर इंदापुरात काही दिवसांपूर्वीच झळकले आहेत. भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांच्या समर्थकांनी हे बॅनर लावले असल्याची चर्चा आहे. यापूर्वी हर्षवर्धन पाटील दोन वेळेस विमान चिन्हावर अपक्ष निवडणूक लढले आहेत. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणूक हर्षवर्धन पाटील अपक्ष लढणार का? असा प्रश्न उपस्थित होत होता. मात्र, गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या तुतारीच्या चर्चांवर आता शिक्कामोर्तब झालं आहे. हर्षवर्धन पाटील यांनी आज शरद पवारांची भेट घेतली असून उद्याच पत्रकार परिषद घेऊन ते आपल्या प्रवेशाची घोषणा करतील. दुसरीकडे त्यांची कन्या अंकिता यांनी देखील व्हॉट्सअप स्टेटसवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे तु

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram