Harshwardhan Patil Indapur : हर्षवर्धन म्हणाले, राष्ट्रवादीत प्रवेश करायचा का? कार्यकर्ते म्हणाले..
Harshwardhan Patil Indapur : हर्षवर्धन म्हणाले, राष्ट्रवादीत प्रवेश करायचा का? कार्यकर्ते म्हणाले..
कार्यकर्त्यांना काल मी निरोप दिला की आपल्याला राजकीय निर्णय घ्यायचा आहे. सर्वांचा आग्रह आहे की विधानसभा आपण लढवली पाहिजे. दोन महिने सगळीकडे जातोय दौरे करतोय. नेमका निर्णय का घ्यायचा यासाठी मी फडणवीसांना भेटायला गेलो. दीड दोन तास चर्चा झाली. त्यांनीही काही प्रस्ताव ठेवले मीही भूमिका मांडली. निवडणूक लढवायची असेल तर विद्यमान सदस्यच लढवणार असं ते म्हटले. दुसरा पर्याय आपण काढू असं फडणवीस म्हटले. दुसरा पर्याय माझ्यासाठी संयुक्तिक ठरला असता. पण सामाजित जीवनात असताना निर्णय घ्यावे लागतात. पवारांना मुंबईला भेटायला गेलो. ते म्हटले, मी तुमच्या मतदारसंघाचा कानोसा घेतला आहे. तुम्ही इंदापूरमधून लढा असं ते म्हटले. कार्यकर्त्यांशी बोललो. राष्ट्रवादी पवार पक्षात जावं असा त्यांचा आग्रह होता. राष्ट्रवादी शरद पवार पक्षात जाण्याचा निर्णय आज आम्ही जाहीर करतो. भाजपमधील सहकाऱ्यांशीही याबाबत बोललो. त्यानंतर आज हा निर्णय घेत आहे. आज इंदापूरमध्ये जनतेची भूमिका महत्वाची आहे. जी माणसं मागे उभी राहिली त्यांना त्रास झाला म्हणून हा जनतेचा उद्रेक या भागात झाला.