Maharashtra Politics : MNS सोबत युतीचा प्रस्ताव नाही, निर्णय INDIA आघाडी घेईल - हर्षवर्धन सकपाळ.
Continues below advertisement
महाराष्ट्राच्या राजकारणात आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सकपाळ (Harshvardhan Sakpal) यांनी मनसेसोबत (MNS) युतीचा कोणताही प्रस्ताव आलेला नाही, असे स्पष्ट केले आहे. तर दुसरीकडे, शरद पवार (Sharad Pawar) यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची (NCP) पुण्यात (Pune) महत्त्वाची बैठक होणार असून, यात महाविकास आघाडीसोबत (Maha Vikas Aghadi) निवडणूक लढवण्यावर चर्चा होण्याची शक्यता आहे. याचबरोबर, मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांच्या हत्येच्या कटाच्या आरोपांवर कांचन नावाच्या व्यक्तीने समोर येऊन आपली बाजू मांडली आहे. हर्षवर्धन सकपाळ यांनी युतीबाबत प्रतिक्रिया देताना सांगितले की, 'तशा प्रकारचा कुठलाही प्रस्ताव अद्यापपर्यंत आलेला नसल्यामुळे चर्चेचा प्रश्न उद्भवत नाही आणि या संदर्भात इंडिया अलायन्सचे (INDIA Alliance) सर्व घटक पक्ष निर्णय घेतील.'
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement