Delhi Blast: अमित शहांनी दिलेल्या निर्देशानुसार पुन्हा बैठकीचं आयोजन
Continues below advertisement
दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ झालेल्या कार स्फोटाचा तपास केंद्रीय गृह मंत्रालयाने राष्ट्रीय तपास यंत्रणेकडे (NIA) सोपवला आहे. या स्फोटात आतापर्यंत १३ जणांचा मृत्यू झाला असून २० हून अधिक जण जखमी झाले आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी घटनास्थळाला आणि रुग्णालयाला भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला. 'या हल्ल्याच्या मुळाशी जाऊन सखोल आणि कसून तपास केला जाईल', असे आश्वासन गृहमंत्री अमित शाह यांनी दिले आहे. या घटनेनंतर दिल्लीत हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. जखमींमध्ये उत्तराखंडच्या उधमसिंह नगर येथील हर्षुल सेठी नावाच्या तरुणाचा समावेश असून, त्याच्यावर एलएनजेपी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement