Harshvardhan Patil Special Report : जुना हिशेब, साथीला साहेब; हर्षवर्धन पाटलांच्या हाती तुतारी

Continues below advertisement

Harshvardhan Patil Special Report : जुना हिशेब, साथीला साहेब; हर्षवर्धन पाटलांच्या हाती तुतारी 

लोकसभेच्या निवडणुकीनंतर शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात इनकमिंग सुरुच आहे. लोकसभा निवडणुकीत शरद पवारांच्या राष्ट्रवादीने 10 जागा लढवून 8 जागांवर निर्वावाद विजय मिळवला. तर साताऱ्याचा जागेवर पिपाणीने घोटाळा केला, असा आरोपही करण्यात आला होता. दरम्यान, लोकसभेत मिळवलेल्या 80 टक्क्यांच्या स्ट्राईक रेटनंतर शरद पवारांच्या पक्षात प्रवेश करण्यासाठी नेत्यांनी रांगा लावल्या आहेत. गुरुवारी शरद पवार सांगलीत होते, तेव्हा एक भाजप नेता भेटीसाठी आला अन् थेट राष्ट्रवादीत प्रवेश केला. दरम्यान भाजपला आज सर्वांत मोठा धक्का बसलाय. कारण राज्याचे बडे नेते म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आणि भुतकाळात मंत्रिपदं भूषवलेल्या हर्षवर्धन पाटलांनी आज (दि.4) भाजपला सोडचिठ्ठी दिली. आता हर्षवर्धन पाटील शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करणार आहेत.  हर्षवर्धन पाटलांच्या प्रवेशामुळे लोकसभेच्या निवडणुकीवेळी शरद पवारांनी इंदापूरचे आमदार दत्तात्रय भरणे यांना दिलेल्या इशाऱ्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय. शरद पवारांनी हर्षवर्धन पाटलांना गळाला लावून दत्तात्रय भरणेंविरोधात तगडा डाव टाकल्याचीही चर्चा आहे. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram