Thackeray Son Wedding : Harshvardhan Patil यांच्या कन्येचा विवाह Balasaheb Thackeray यांच्या नातवाशी

Continues below advertisement

Thackeray Family Daughter-in-law : माजी मंत्री आणि भाजपचे नेते हर्षवर्धन पाटील (Harshvardhan Patil) यांच्या कन्या अंकिता पाटील ठाकरे घराण्याची सून होणार आहे. निहार बिंदूमाधव ठाकरे यांच्याशी येत्या 28 डिसेंबर रोजी त्यांचा विवाह होणार आहे. हर्षवर्धन पाटील यांनी आज मनसे प्रमुख राज ठाकरे यांची भेट घेतली आणि लग्नाचे निमंत्रण दिले. येत्या 28 डिसेंबरला मुंबईमध्ये निहार ठाकरे आणि अंकिता पाटील यांचा विवाह मोजक्याच लोकांच्या उपस्थितीत होणार आहे. निहार ठाकरे हे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नातू आहेत..  निहार यांच्या वडील बिंदुमाधव यांचे 1996 मध्ये अपघाती निधन झाले होते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि जयदेव ठाकरे हे निहार यांचे सख्खे काका आहेत, तर राज ठाकरे हे त्यांचे सख्खे चुलत काका आहेत. निहार ठाकरे हे पेशाने वकील आहेत. अंकिता पाटील या पुणे जिल्हा परिषदेच्या सदस्य आहेत. अंकिता पाटील या काँग्रेसच्या काँग्रेसच्या चिन्हावर निवडून आल्या असल्या तरी गेल्या काही दिवसापासून त्यांनी भाजपशी जवळीक साधली आहे.. ठाकरे-पाटील विवाहामुळे  राजकीय वर्तुळात चर्चाना उधाण आलंय. विवाहाच्या निमित्ताने पाटील यांचे मूळ गाव असलेल्या बावडा येथेही गावकऱ्यांसाठी थाटामाटाने भोजनसोहळा 17 डिसेंबर रोजी होणार आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram