Gyanvapi Mosque Pooja : ज्ञानवापी मशिदीच्या तळघरात होणार पूजा, जिल्हा न्यायालयानं दिली परवानगी!

Continues below advertisement

ज्ञानवापी मशिदीच्या तळघरात पूजाअर्चा करण्यास जिल्हा न्यायालयाने परवानगी दिलीय. हिंदू पक्षाने तळघरात पूजन करण्याची परवानगी मागितली होती. मशिदीच्या व्यास तळघरात आता पूजन करण्याचा मार्ग मोकळा झालाय. सोमनाथ व्यास यांचा परिवार या तळघरात १९९३ पर्यंत पूजाअर्चा करत होता. मात्र तत्कालीन राज्य सरकारच्या आदेशाने तळघरात पूजाअर्चा  बंद झाली. १७ जानेवारीला व्यास तळघराला जिल्हा प्रशासनाने आपल्य़ा ताब्यात घेतलं होतं. एएसआयच्या सर्व्हेसाठी तळघराची साफसफाई करण्यात आली. आता काशी विश्वनाथ ट्रस्टच्या आधीन राहून ही पूजा अर्चा केली जाईल. तळघरात अनेक देवीदेवतांच्या मूर्ती आहेत त्यांची पूजा अर्चा करण्याचा मार्ग मोकळा झालाय. 

 

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram