Guru Purnima | गुरूपौर्णिमेनिमित्त शेगवामध्ये भाविकांची मोठी गर्दी ABP Majha
आज गुरुपौर्णिमा असल्याने शेगाव येथील संत गजानन महाराज मंदिरात देशभरातून भाविकांची मांदियाळी बघायला मिळत आहे. गुरुपौर्णिमेनिमित्त अनेक दिंड्या व हजारो भाविक हे शेगावात दाखल झाले आहेत. संत गजानन महाराजांच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी रांगही लागली आहे.
हे देखील वाचा
Mahayuti Seat Sharing: भाजप विधानसभेच्या 155 ते 160 जागा लढण्याची शक्यता, मुख्यमंत्रीपदाबाबत महत्त्वाची स्ट्रॅटेजी
मुंबई: महायुतीतील मोठा भाऊ असलेल्या भाजपने राज्यातील आगामी विधानसभा निवडणुकीत 155 ते 160 जागा लढवण्याचा निर्धार केल्याची माहिती समोर आली आहे. कोणत्याही परिस्थितीत विधानसभेच्या 155 पेक्षा कमी जागा लढवायच्या नाहीत, अशी भूमिका राज्यातील भाजप (BJP) नेत्यांनी घेतल्याचे समजते. त्यामुळे महायुतीमधील शिवसेना शिंदे गट (Shinde Camp) आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या (Ajit Pawar Camp) वाट्याला अवघ्या 128 ते 133 जागाच येण्याची शक्यता आहे. महायुतीमधील (Mahayuti) उर्वरित घटकपक्षांसाठी जागा सोडाव्या लागतील. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत (Vidhansabha Election 2024) शिंदे गट आणि अजितदादा गटाचे 80 ते 100 जागा लढवण्याचे स्वप्न अधुरेच राहण्याची शक्यता आहे. 'दैनिक लोकमत'मध्ये याबाबतचे वृत्त प्रसिद्ध झाले आहे.
पुण्यात सोमवारी भाजपचे महासंमेलन पार पडणार आहे. या महासंमेलनासाठी भाजपचे केंद्रीय नेते अमित शाह हे शनिवारी रात्रीच पुण्यात दाखल झाले होते. भाजपकडून सोमवारी विधानसभा निवडणुकीसाठी रणशिंग फुंकले जाईल. तत्पूर्वी आज पुण्यात भाजप प्रदेश कार्यकारिणीचे अधिवेशन पार पडेल. या अधिवेशनाला अमित शाह उपस्थित राहणार आहेत. यावेळी ते भाजप कार्यकर्त्यांना काय संदेश देणार, हे पाहावे लागेल. गुरुवारी आणि शुक्रवारी भाजप बैठकीमध्ये राज्यातील विधानसभेच्या जागांविषयी आढावा घेण्यात आला होता. त्यानंतर आज अमित शाह यांच्या उपस्थितीत पुण्यात बालेवाडी येथील श्री शिव छत्रपती क्रीडा संकुल येथे प्रदेश कार्यकारिणीचे अधिवेशन होईल. सकाळी 11 पासून अधिवेशनाला सुरवात होईल. लोकसभेत राज्यात भाजपाला मिळेलेल्या कमी जागा यावर अमित शहा यांच्याकडून पदाधिकाऱ्यांची कशी कानउघडणी होणार का, याबाबत उत्सुकता असणार आहे.