हिंदू राष्ट्राबाबत राज ठाकरेंच्या भूमिकेशी सहमत असल्यास मनसे-भाजपनं एकत्र यावं : गुरु माँ कांचनगिरी
Continues below advertisement
Guru Maa Kanchan Giri meets Raj Thackeray : अयोध्येच्या साध्वी गुरु माँ कांचनगिरी (Guru Maa Kanchan Giri) यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांची भेट घेतली. यावेळी त्यांच्यासोबत सूर्याचार्यजी देखील उपस्थित होते. या भेटीमुळे महापालिका निवडणुकीआधी मनसेची हिंदुत्वाच्या मुद्द्याकडे वाटचाल असल्याची चर्चा सुरु झाली आहे. राज ठाकरेंच्या भेटीआधी गुरु मॉं कांचनगिरी यांनी शिवाजी पार्क इथं शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृती स्थळावर जाऊन आदरांजली वाहिली. त्यांच्यासोबत सूर्याचार्यजी देखील उपस्थित होते. राज ठाकरेंसोबतच्या बैठकीनंतर गुरु माँ कांचनगिरी यांनी माध्यमांशी संवाद साधत राज ठाकरेंसोबतच्या भेटीचा हेतू स्पष्ट केला. तसेच त्यांनी हिंदुत्वाच्या मुद्यावर विचारधारा जमत असेल तर मनसेनं भाजपसोबत जावं, असंही म्हटलं आहे.
Continues below advertisement