ST Workers Strike : कोर्टानं कामगारांना कोणताही अल्टिमेटम दिलेला नाही, वकील गुणरत्न सदावर्तेंचा दावा
गेल्या पाच महिन्यांपासून संपावर असलेल्या एसटीच्या कर्मचाऱ्यांना कामावर रुजू होण्यासाठी २२ एप्रिलपर्यंतची मुदत देत उच्च न्यायालयाने हा तिढा सोडविण्याच्या दृष्टीने बुधवारी महत्वाचा आदेश दिला. या मुदतीत कामावर रूजू होणाऱ्या कर्मचाऱ्यांनाच सर्व प्रकारच्या कारवाईपासून संरक्षण देण्याचे आदेश न्यायालयाने दिले. दरम्यान, कोर्टानं कामगारांना कोणताही अल्टिमेटम दिलेला नाही, असा दावा एसटी कर्मचाऱ्यांचे वकील गुणरत्न सदावर्ते यांनी केलाय. त्यामुळे कोर्टाचा संपूर्ण निर्णय हाती आल्यानंतर निर्णय घेऊ असं सदावर्ते यांनी सांगितलंय.