Gunratna Sadavarte यांनी लेकीच्या बारशातही ठोकलं होतं एसटीबद्दलच भाषण, व्हिडीओ व्हायरल
पवारांच्या घरांवरील हल्ल्याप्रकरणी वकील गुणरत्न सदावर्ते पोलीस कोठडीची हवा खाताहेत... गुणरत्न सदावर्तेंच्या संदर्भातली कोणतीही गोष्ट असली आणि त्याची चर्चा झाली नाही तरच नवल... आणि याला सदावर्तेंच्या लहान मुलीचं बारसं देखील अपवाद नाही ठरलं... डिसेंबर 2021 मध्ये नांदेड शहरात पार पडलेल्या या सोहळ्याला बारसं म्हणावं की एसटी विलिनीकरणाच्या मागणीसाठी आयोजित केलेला मेळावा असा प्रश्न ही दृश्य पाहिल्यानंतर कुणालाही पडेल.. कारण पाहुणे म्हणून उपस्थित राहिलेल्यांमध्ये एसटी कर्मचाऱ्यांचीच संख्या जास्त दिसतेय.. बारश्याला चिमुकल्यांसाठी वाजवली जाणारी गाणी कानी पडण्याऐवजी, एसटीच्या विलिनीकरणासाठी दिल्या जाणाऱ्या घोषणा कानावर पडत होत्या...सदावर्ते दाम्पत्यांनी त्यांच्या दुसऱ्या लेकीचं नाव युना ठेवलं.. या सोहळ्याची दृश्य सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताहेत.. बारश्यासाठी आलेले आंदोलकांनी गाण्याच्या तालावर ठेका धरलेला दिसला.. लेकीचं बारसं असलं तरी सदावर्तेंनी त्यांच्या नेहमीच्या आवेशात एसटी आंदोलनासंदर्भात भाषण ठोकलं....