Gunratna Sadavarte On Raj Thackeray : कारवर शाई आणि सुपारी फेकल्याने सदावर्ते आक्रमक, राज ठाकरेंना अरे-तुरेची भाषा

Continues below advertisement

Gunratna Sadavarte On Raj Thackeray :  कारवर शाई आणि सुपारी फेकल्याने सदावर्ते आक्रमक, राज ठाकरेंना अरे-तुरेची भाषा

 जालन्यात अॅड. गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी  शाई आणि सुपारी फेक केली आहे. या घटनेनंतर सदावर्ते चांगलेच आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे. शाईफेक प्रकरणावरुन गुणरत्न सदावर्ते यांनी मनसे प्रमुख राज ठाकरे आणि मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्यावर टीका केली आहे. राज ठाकरे तुला सांगतो आजचा प्रकार तुझ्या माणसांनी माझ्या गाडीवर ज्वलनशील पदार्थ टाकला, त्यांचा जाळण्याचा उद्देश होता का? असा सवाल सदावर्ते यांनी केला आहे. जालन्यामध्ये झालेल्या शाईफेक प्रकरणावरून सदावर्ते यांचा राज ठाकरे आणि मनोज जरांगे यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. राज ठाकरे मी तुला आव्हान करतो की तू सांग मी म्हणशील तिथे येतो वैचारिक चर्चा करु. वैचारिक चर्चेमध्ये तू हरलास तर तू उठबशा काढ आणि मी हरलो तर तर म्हणेल ती शिक्षा भोगायला तयार आहे, असं खुळं आव्हान गुणरत्न सदावर्ते यांनी राज ठाकरेंना दिलं आहे. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola