Asaduddin Owaisi On Nida Khan Case : ओवेसींनी निदा खान प्रकरणच उडवून लावलं, म्हणाले, सुशिक्षित मुस्लिमांना त्रास देण्यासाठीचा कट!
Asaduddin Owaisi On Nida Khan Case : ओवेसींनी निदा खान प्रकरणच उडवून लावलं, म्हणाले, सुशिक्षित मुस्लिमांना त्रास देण्यासाठीचा कट!
नाशिक धर्मांतरण प्रकरण हा द्वेष भावनेतून केलेला प्रकार आहे. सत्ताधारी पक्षाच्या नेत्याने या प्रकरणात तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणातील आरोपी असलेली निदा खान हिच्याबाबतही असाच प्रकार घडत आहे. तिच्यावर केवळ आरोप झाले म्हणून तिची मिडिया ट्रायल करुन तिला दोषी ठरवण्याचा प्रकार सुरु आहे. मात्र, आमचा न्यायालयावर पूर्ण विश्वास आहे. न्यायालय या मुलीला निर्दोष ठरवेल, असा विश्वास असदुद्दीन ओवेसी यांनी व्यक्त केला. तसेच हा सगळा प्रकार सुशिक्षित मुस्लीम मुलामुलींना त्रास देण्यासाठी करण्यात आला आहे, असा आरोपही ओवेसी यांनी केला. ते शनिवारी छत्रपती संभाजीनगर येथे आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते.यावेळी असदुद्दीन ओवेसी यांनी नाशिक धर्मांतरण प्रकरणातील आरोपी निदा खान हिची पाठराखण केली. तुम्ही या प्रकरणात टिसीएस कंपनीने प्रसिद्ध केलेले निवेदन पाहिले असेल. ती मुलगी एचआर डिपार्टमेंटमध्ये नव्हती. या प्रकरणात आतापर्यंत 9 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्यापैकी एका गुन्ह्यात मुलीने धार्मिक भावना दुखावल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. या मुलीची ट्रान्सफर झाली होती, तिचा कंपनीशी संबंधही नव्हता. या प्रकरणातील तक्रार सत्ताधारी नेत्याने केली होती. आपण आताच या सगळ्याचा निकाल देऊ शकत नाही. या प्रकरणात मिडिया ट्रायल सुरु आहे, असे असदुद्दीने ओवेसी यांनी म्हटले.