Gunaratna Sadawarte on Manoj Jarange : जरांगे दादा झाला काय? जरांगेंना शरद पवार बळ देतायत

Continues below advertisement

Gunaratna Sadawarte on Manoj Jarange : जरांगे दादा झाला काय? जरांगेंना शरद पवार बळ देतायत

छत्रपती संभाजीनगर: मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून सगेसोयऱ्यांचे आरक्षण द्या, त्याशिवाय आंदोलनातून माघार घेणार नाही, अशी आक्रमक भूमिका घेणाऱ्या मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांच्यावर गुणरत्न सदावर्ते (Gunaratna Sadavarte) यांनी पुन्हा एकदा कडाडून टीका केली आहे. जरांगे कोण आहे? जरांगे हे काय दादा झाले आहेत का?, असा सवाल त्यांनी विचारला. ते बुधवारी छत्रपती संभाजीनगर येथील पत्रकार परिषदेत बोलत होते. 

या पत्रकार परिषदेत गुणरत्न सदावर्ते यांनी एक गंभीर आरोप केला. नैराश्यात असलेल्या मनोज जरांगे यांना शरद पवारांसारखे नेते हवा देऊन फुगवत आहेत. त्यांनी असे करु नये, असे सदावर्ते यांनी म्हटले. मराठा बांधवांनी मनोज जरांगे यांच्या नादाला लागू नये. यापूर्वीही मनोज जरांगे यांनी बेकायदेशीरपणे वर्तन करुन मुंबईत येऊन धुडगूस घालू, असे म्हटले होते. ते मुंबईला वेठीस धरु पाहत होते. त्यावेळी त्यांच्याविरोधात बोलणारा मीच होतो. कायद्याचे उल्लंघन करुन अशाप्रकारे वेशीत घुसता येत नाही, हे मी दाखवून दिले आहे. मनोज जरांगे मुंबईकडे येत असताना १४९ ची नोटीस निघाली होती. मी दाखल केलेल्या याचिकनंतरच ती नोटीस जारी करण्यात आली होती, गुणरत्न सदावर्ते यांनी म्हटले. यावेळी गुणरत्न सदावर्ते यांनी मनोज जरांगेंची खिल्लीही उडवली. राज्यपालांची सही नाही तर आरक्षण नाही आणि सलाईन नाही लागली तर उपोषण नाही, अशा शब्दांत सदावर्ते यांनी जरागेंना लक्ष्य केले.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram