Gunaratna Sadavarte : एसटी कामगारांचा संप मिटणार? काय म्हणतायत गुणरत्न सदावर्ते ABP Majha

एसटी संपाचा तिढा अखेर सुटण्य़ाच्या मार्गावर आहे.. एसटी कर्मचा-यांनी 22 एप्रिलपर्यंत कामावर रूजू व्हावं असे आदेश हायकोर्टानं दिले आहेत. तसंच राज्य सरकारनं किंवा एसटी महामंडळानं कुठल्याही कामगारावर कारवाई नको अशा सूचनाही हायकोर्टानं केल्या आहेत.  एसटी कर्मचाऱ्यांना याआधीपासूनच ग्रॅच्युटी, पीएफ लागू असल्याची माहिती परिवहन मंत्री अनिल परब यांनी दिली. तर जोपर्यंत न्यायालयानं केलेल्या सूचनांची प्रत जोपर्यंत हातात पडत नाही तोपर्यंत संपाबाबतचा निर्णय मागे घेणार नाही असं गुणरत्न सदावर्ते यांनी म्हटलंय. दरम्यान,  दिलेल्या मुदतीत जे कर्मचारी कामावर येणार नाहीत, त्यांच्यावर आम्ही कारवाई करू अशा शब्दांमध्ये परिवहनमंत्री अनिल परब यांनी एसटी कर्मचाऱ्यांना अल्टिमेटम दिला. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola