Gunaratna Sadavarte on Marathi : राज ठाकरेंच्या औलादी कुठे शिकल्या?भाषा सक्ती हा मुघली विचार
Gunaratna Sadavarte on Marathi : राज ठाकरेंच्या औलादी कुठे शिकल्या?भाषा सक्ती हा मुघली विचार
भय्यूजी जोशी यांचा भाषेवरील अभ्यास खूप मोठाय या देशात कुठेही भाषेची सक्ती करणं गैर आहे विविध भाषा हे या देशाच्या सौंदर्याचं प्रतिक असून देशाच्या सहिष्णूतेचं त्यातून दर्शन होतं त्यामुळे संविधानानुसार भय्यूजी जोशी यांच्या वक्तव्यात आक्षेप घेण्यासारखं काहीही नाही भाषेची सक्ती करणं हे मुघली विचारांचं प्रतिक आहे उद्धव आणि राज यांनी आपली मुलं कुठल्या शाळेत शिकली याचं भान ठेवावं, मग मराठी भाषेबद्दल बोलावं आपल्याकडे मराठीही काही किमी वर बदलत जाते, त्यामुळे राजकारण्यांनी त्याच भांडवल करू नका
हे ही वाचा..
मुंबईत येणाऱ्या प्रत्येकाला मराठी शिकलं पाहिजे असं नाही, असे वक्तव्य करुन वादाला तोंड फोडणारे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ नेते भय्याजी जोशी यांना मनसेप्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी चांगलेच धारेवर धरले. भय्याजी जोशी (Bhaiyyaji Joshi) यांच्या या वक्तव्याच्या माध्यमातून काय चाललंय हे समजण्याइतका मराठी माणूस दुधखुळा नाही. आपण या सगळ्यातून नवा संघर्ष निर्माण करत आहात. तुमचं हे वाक्य मराठी माणूस कधी विसरणार नाही, असा इशारा राज ठाकरे यांनी दिला.
भय्याजी जोशी यांनी बुधवारी मुंबई उपनगरातील विद्याविहार परिसरातील कार्यक्रमात हे वादग्रस्त वक्तव्य केले होते. मुंबईत अनेक भाषा आहेत आणि घाटकोपरची भाषा गुजराती आहे, त्यामुळे मुंबईत येणाऱ्या प्रत्येकाला मराठी शिकलं पाहिजे असं नाही, असे त्यांनी म्हटले. त्यांच्या या वक्तव्याचे पडसाद गुरुवारी अर्थसंकल्पीय अधिवेशनात उमटताना दिसले. भय्याजी जोशी यांच्या वक्तव्यावर ठाकरे गटाने जोरदार हल्ला चढवला. तर भाजपचे नितेश राणे, राम कदम यांनी प्रतिहल्ला करत भय्याजी जोशी यांची बाजू सावरण्याचा प्रयत्न केला. उद्धव ठाकरे यांनी या मुद्द्यावरुन भाजप आणि संघावर कडाडून टीका केली. त्यानंतर आता राज ठाकरेही मैदानात उतरल्याने मराठी भाषेचा मुद्दा तापण्याची शक्यता आहे.