Gujarat Politics: 'मुख्यमंत्री-प्रदेशाध्यक्ष यांच्यात शीतयुद्ध?', Bhupendra Patel सरकारमधील सर्व 16 मंत्र्यांचे राजीनामे

Continues below advertisement
गुजरात (Gujarat) मध्ये मोठी राजकीय घडामोड, मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल (CM Bhupendra Patel) वगळता संपूर्ण मंत्रिमंडळाने राजीनामा दिला आहे. यामागे 'मुख्यमंत्री आणि भाजपचे पक्ष प्रदेशाध्यक्ष यांच्यातील शीतयुद्धाचा परिणाम आहे का?' असा प्रश्न राजकीय वर्तुळात उपस्थित झाला आहे. मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीनंतर सर्व १६ मंत्र्यांनी एकत्रितपणे आपले राजीनामे सादर केले. विशेष म्हणजे, मुख्यमंत्र्यांनी कोणाचाही राजीनामा मागितला नव्हता, तरीही हा सामूहिक निर्णय घेण्यात आल्याचे कळते. पक्षाचे नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष जगदीश विश्वकर्मा (Jagdish Vishwakarma) यांनी राजीनामा दिल्यानंतर, इतर सर्व मंत्र्यांनीही त्यांचे अनुसरण केले. या अनपेक्षित घडामोडीमुळे गुजरात भाजपमध्ये (Gujarat BJP) अंतर्गत काहीतरी गडबड असल्याची चर्चा सुरू झाली असून, आता पक्षश्रेष्ठी यावर काय भूमिका घेणार याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola