ECI Under Fire: 'निवडणूक आयोगात चोर आहेत', Sanjay Raut यांचा सत्ताधाऱ्यांवर गंभीर आरोप

Continues below advertisement
ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी निवडणूक आयोग (Election Commission) आणि भाजपवर (BJP) जोरदार टीका केली आहे. 'निवडणूक आयोगात चोर आहेत आणि चोरांचे सरदार आहेत' असं गंभीर वक्तव्य संजय राऊत यांनी केलं आहे. त्यांनी निवडणूक आयोगाला भाजपची एक विस्तारित शाखा म्हटले आहे. राऊत यांनी आरोप केला की काल महाराष्ट्रातील सत्ताधारी पक्ष वगळता जवळपास सर्व राजकीय पक्षांनी निवडणूक आयोगाकडे धाव घेतली होती, पण भाजपचे नेते आले नाहीत कारण ते 'चोर' आहेत. या आरोपांमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडाली असून निवडणूक प्रक्रियेच्या पारदर्शकतेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola