Gudi Padwa 2021 | गुढीपाडव्याच्या निमित्तानं लाडक्या विठुराया- रुक्मिणीमातेसाठी फुलांची आरास
Continues below advertisement
अतिशय महत्त्वाच्या आणि शुभ अशा गुढीपाडवा आणि मराठी नववर्षाच्या शुभमूहूर्तावर सर्वत्र एकच सकारात्मकतेचं वातावरण पाहायला मिळत आहे. यंदाच्या वर्षी या सणावर कोरोनाचं सावट असलं तरीही काही प्रथा, परंपरा मात्र सुरुच आहेत. गुढीपाडव्याच्या याच अतिशय खास दिवसानिमित्त पंढरपूर येथील विठ्ठल आणि रुक्मिणी मंदिरात फुलांची नयनरम्य आरास केल्याचं पाहायला मिळत आहे. झेंडूच्या फुलांचा वापरत करत सुरेख अशा रंगसंगतीनं ही आरास साकारण्यात आली आहे. विठुरायाच्या दर्शनासाठी न जाता जेणाऱ्यांसाठी हे साजिरं रुप म्हणजे जणू परवणीच.
Continues below advertisement