Dadar vegetable market| दादर मार्केटमध्ये सलग दुसऱ्या दिवशी नागरिकांची गर्दी,सोशल डिस्टन्सिगचा फज्जा

राज्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे, त्यामुळे कोरोनाची ही साखळी तोडण्यासाठी राज्य सरकारने काही कडक निर्बंध लावले आहेत. मात्र आज सकाळी सलग दुसऱ्या दिवशी मुंबईच्या दादर भाजी मार्केटमध्ये नागरिकांनी भाजी घेण्यासाठी प्रचंड गर्दी केली आहे. या गर्दीमध्ये मोठ्या संख्येने नागरिक एकत्र जमले असून अनेकांनी मास्कही घातलेला नाही. या गर्दीमध्ये नागरिकांनी सोशल डिस्टंसिंगचाही फज्जा उडवलेला आहे. सध्या मुंबई पोलिसांच्या आणि मुंबई महानगर पालिकेच्या माध्यमातून सातत्याने गर्दी न करण्याचं आवाहन केलं जात आहे. मात्र नागरिक याकडे कानाडोळा करताना आपल्याला पाहायला मिळत आहे. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola