GST Council Meeting | सर्वसामान्यांना दिलासा, दोन GST Slab रद्द होणार, 75 वस्तू स्वस्त!

GST परिषदेची दोन दिवसीय बैठक आजपासून सुरू होत आहे. या बैठकीत सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. GST मधील दोन स्लॅब रद्द करण्याचा निर्णय घेतला जाऊ शकतो. बारा टक्के आणि अठ्ठावीस टक्क्यांचे स्लॅब रद्द करून पाच टक्के आणि अठरा टक्क्यांचे स्लॅब कायम ठेवले जाण्याची शक्यता आहे. लक्झरी साहित्यावर चाळीस टक्के GST लागू केला जाण्याची शक्यता आहे. अन्नपदार्थ, औषधे, विमा हप्ता, टीव्ही, एसी, फ्रीज, वॉशिंग मशीन, सिमेंट, कार, बाईक यांसारख्या पंचाहत्तर वस्तूंवरील GST करात कपात केली जाण्याची शक्यता आहे. यामुळे सर्वसामान्यांशी थेट निगडीत असलेल्या या वस्तू स्वस्त होतील. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पंधरा ऑगस्टला लाल किल्ल्यावरून या संदर्भात सूतोवाच केले होते. तब्बल शंभर पंचाहत्तर वस्तूंवरील दरामध्ये कपात होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. ही बैठक दोन दिवस सुरू राहणार आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola