Shrikant Shinde on Maratha Reservation : मराठा समाजाला दिलासा, श्रीकांत शिंदेंची पोस्ट
खासदार श्रीकांत शिंदे यांनी ट्विटरवरून माहिती दिली आहे. तत्कालीन मुख्यमंत्री आणि विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाची सूत्रे हातात घेतल्यानंतर मराठा समाजाच्या मागण्यांकडे गांभीर्याने पाहिले. त्यांनी मराठा समाजासाठी ठोस पावले उचलली. सर्वप्रथम शिंदे समिती स्थापन करण्यात आली. या समितीच्या अभ्यासातून हैदराबाद गॅझेट पुढे आले. हैदराबाद गॅझेटमध्ये मराठा समाजातील अनेक कुटुंबांची नोंद कुणबी म्हणून करण्यात आली होती. हाच आधार घेऊन मराठा समाजाला आरक्षणाचा मार्ग खुला करण्याची दिशा ठरली. आता पात्र नागरिकांना कुणबी प्रमाणपत्र मिळविण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. मराठा समाजाच्या इतिहासात आज एक नवा अध्याय लिहिला गेला आहे. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि मराठा आरक्षणासाठी लढा देणाऱ्या मनोज रांगेंचे यासाठी अभिनंदन करण्यात आले आहे.