Aurangabad : 56 वर्षीय आजीने नातवासोबत दहावीचा पहिला पेपर दिला,शेख हजराबी शेख गनी असं त्यांचं नाव
शिक्षण घेण्यासाठी वय नसते असं म्हणणात हे अगदी खरं......आणि याचा प्रत्यय औरंगाबादमध्ये आला . औरंगाबाद शहरातील हर्सूलमध्ये राहणाऱ्या एका ५६ वर्षीय आजीने नातवासोबत यावर्षी दहावीचा पहिला पेपर दिला. शेख हजराबी शेख गनी असं त्यांचं नाव आहे. घरची परिस्थिती खूप बेताची असल्यानं हजराबी शेख यांना शिक्षण घेता आलं नाही. पण शिक्षण घेण्याचे स्वप्न त्यांनी उराशी बाळगलं होतं.. ते पूर्ण करण्याच्या दिशेनं पावलं टात त्यांनी यंदा दहावी बोर्डाची परीक्षा दिलेय. शेख आजींना तीन मुले, एक मुलगी आणि नातवंडं आहेत. त्यांचा एक नातू आता दहावीला आहे. त्यांच्यासोबत आजींनी अभ्यास केला आणि आता बोर्डाची परीक्षा त्या देतायत