Gram Panchayat Elections 2021 | अंबरनाथमध्ये 26 ग्रामपंचायतींसाठी आज मतदान
अंबरनाथ तालुक्यातील 27 ग्रामपंचायतीच्या निवडणुका जाहीर झाल्या होत्या. या 27 पैकी गोरेगाव ही एकमेव ग्रामपंचायत बिनविरोध झाली. विविध ग्रामपंचायतीतील 68 उमेदवारांची निवड बिनविरोध झाली आहे. अंबरनाथमधल्या 26 ग्रामपंचायतीमध्ये 173 जागांवर निवडणूका होणार असून 247 उमेदवार रिंगणात आहेत. 78 मतदान केंद्रावर आज मतदान होणार आहे. आज सकाळपासूनच नेवाळी ग्रामपंचायतीच्या मतदान केंद्रावर मतदारांनी रांगा लावल्या होत्या. मतदारांनी कोरोनाचे नियमांचे पालन केल्याचे दिसून आलं. या ठिकाणी काही अनुचित प्रकार घडू नये म्हणून मतदान केंद्रावर कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. तसेच कल्याण तालुक्यातील 21 ग्रामपंचायतीपैकी वरप ही एकमेव ग्रामपंचायत बिनविरोध झाली असून विविध ग्रामपंचायतीमधील 44 उमेदवार बिनविरोध तर 20 ग्रामपंचायतीमधील 167 जागांवर निवडणुका होणार आहेत त्यासाठी आज मतदान प्रक्रिया पार पडत आहे.
Tags :
Gram Panchayat Elections LIVE Elections 2021 Gram Panchayat Elections 2021 Maharashtra Gram Panchayat Election 2021 Gram Panchayat Election 2021 Maharashtra Elections