Pansare Murder Case : कॉम्रेड पानसरे हत्या प्रकरण, मुख्य आरोपीसह तिघांना जामीन

Continues below advertisement
कॉम्रेड गोविंद पानसरे (Govind Pansare) हत्या प्रकरणात संशयित आरोपी असलेले डॉ. विरेंद्रसिंग तावडे, अमोल काळे आणि शरद कळसकर यांना मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचने जामीन मंजूर केला आहे. यामुळे या प्रकरणातील अटक करण्यात आलेले सर्व बाराही संशयित आरोपी आता जामिनावर बाहेर आले आहेत. बचाव पक्षाच्या वकिलांनी दिलेल्या माहितीनुसार, 'डॉ. विरेंद्रसिंग तावडे (Dr. Virendrasing Tawde) जे ENT सर्जन आणि गोल्ड मेडलिस्ट आहेत, त्यांचा जामीन पूर्वी चुकीच्या कारणांनी रद्द करण्यात आला होता, तो उच्च न्यायालयाने आता परत दिला आहे'. या तिघांना जामीन मंजूर झाल्याने ते कळंबा कारागृहातून बाहेर येतील, ज्यामुळे पानसरे हत्या प्रकरणातील एकही आरोपी आता तुरुंगात नाही. मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती शिवकुमार डिगे यांच्या खंडपीठाने हा निर्णय दिला.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola