Saamana : राज्यपालांकडून उधळलेल्या हत्तीचा रोल, सामना वर्तमानपत्रातून राज्यपालांवर टीकास्त्र
Continues below advertisement
"राज्यपाल हे फक्त सरकारी पैशावर पोसले जाणारे पांढरे हत्ती नाहीत. दिल्लीत सत्ता असलेल्या पक्षांची सरकारे ज्या राज्यांमध्ये नाहीत त्या राज्यांत ते मदमस्त उधळलेल्या हत्तीचाच 'रोल' अदा करतात व अशा हत्तींचे माहुत दिल्लीत बसून नियंत्रण करीत असतात. त्याच हत्तीच्या पायाखाली लोकशाही घटना, कायदा, राजकीय संस्कृती तुडवत वेगळे पायंडे पाडले जात असतात. केंद्राचे सरकार, पंतप्रधान हे संपूर्ण देशाचे नेते असतात." असा मजकूर सामना वृत्तपत्राच्या अग्रलेखात लिहिण्यात आलाय.
Continues below advertisement