Nanded : नांदेड स्वामी रामानंद तीर्थ विद्यापठातील वसतिगृहाचं राज्यपालांकडून उदघाटन रद्द ABP Majha
Continues below advertisement
ज्या उद्घाटन कार्यक्रमामुळे राज्यपालांचा आजचा दौरा वादात अडकणार होता, ते उद्धाटनही झालेलं नाही. नांदेड स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठातील अल्पसंख्याक मुला-मुलींच्या वसतिगृहांचं उद्घाटन करणं राज्यपाल कोश्यारींनी टाळलंय. विद्यापीठाचे जनसंपर्क अधिकारी अशोक कदम यांनी वसतिगृहाच्या उद्घाटनाचा कार्यक्रम रद्द झाल्याची माहिती दिली. विद्यापीठ परिसरात वृक्षारोपण करुनच राज्यपाल गुरुद्वाराकडे रवाना झालेत. तीन वर्षांपासून वापरातील वसतिगृहांचं उद्घाटन होणार असल्यानं वादाची शक्यता होती. पण राज्यपालांनी उद्घाटन न केल्यानं वाद शमलाय.
Continues below advertisement