Maharashtra Government Decision | पहिली ते पाचवीसाठी हिंदीचा पर्याय, मराठी अभ्यास केंद्राचा विरोध

महाराष्ट्र शासनाने इयत्ता पहिली ते पाचवीसाठी हिंदी शिक्षण सक्तीचे करण्याचा निर्णय घेतला आहे. मराठी अभ्यास केंद्राचे सदस्य सुशील शेजुळे यांनी या निर्णयाला महाराष्ट्रविरोधी म्हटले आहे. विद्यार्थ्यांच्या वयाचा विचार करता हा निर्णय त्यांच्या मानसिकतेवर आघात करणारा असल्याचे शेजुळे यांनी सांगितले. हिंदीचे महत्त्व वाढविणारा हा आत्मघातकी निर्णय सरकारने मागे घ्यावा अशी मागणी त्यांनी केली आहे. 

काल जो शासन निर्णय निघाला आहे त्याचा एकच अर्थ निघतोय की इयत्ता पहिली ते पाचवी पासूनच्या विद्यार्थ्यांना हिंदी ही सक्तीने शिकावी लागणार आहे। हा महाराष्ट्रविरोधी शासन निर्णय आहे. हा विद्यार्थ्यांच्या वयाचा विचार करता त्यांच्या मानसिकतेवर आघात करणारा शासन निर्णय आहे. या निर्णयाचा आम्ही विरोध करत आहोत. हिंदीचे आणखी महत्त्व वाढविणारा आत्मघातकी निर्णय सरकारने मागे घ्यावा, असं सुशील शेजुळे म्हणाले.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola