Caller ID Rule: 'Unknown Number'ची चिंता मिटणार, आता थेट नाव दिसणार! केंद्र सरकारचा मोठा निर्णय
Continues below advertisement
केंद्र सरकारने (Central Government) आता मोबाईलवर येणाऱ्या अनोळखी कॉल्सना (Unknown Calls) आळा घालण्यासाठी एक महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. टेलिकॉम रेग्युलेटरी अथॉरिटी ऑफ इंडिया (TRAI) च्या शिफारशींनुसार, देशात कॉलिंग नेम प्रेजेंटेशन (CNAP) सेवा सुरू करण्याचे निर्देश टेलिकॉम कंपन्यांना देण्यात आले आहेत. 'यापुढे मोबाईलवरती संपर्क करणाऱ्या व्यक्तीच्या क्रमांकासह त्याचं खरं नाव सुद्धा दिसू शकेल', ज्यामुळे मोबाईलवर येणारे स्पॅम कॉल्स आणि फसवणुकीच्या घटनांना आळा बसेल अशी अपेक्षा आहे. सरकारने टेलिकॉम कंपन्यांना सुरुवातीला किमान एका सर्कलमध्ये तरी ही सेवा सुरू करण्यास सांगितले आहे. ही सेवा सुरू झाल्यावर, जेव्हा तुम्हाला अनोळखी नंबरवरून कॉल येईल, तेव्हा तुमच्या मोबाईल स्क्रीनवर कॉलरच्या क्रमांकासोबत त्याचे नावही दिसेल, जे त्याच्या अधिकृत ओळखपत्रावर (KYC) आधारित असेल. यामुळे वापरकर्त्यांना कॉल कोणी केला आहे हे समजणे सोपे जाईल आणि फसवणुकीचे प्रकार टाळता येतील.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement