Omicron : ओमिक्रॉन व्हेरियंटला महाराष्ट्रापासून दूर ठेवण्यासाठी राज्य सरकार अॅक्शन मोडमध्ये
दक्षिण आफ्रिकेतील कोरोनाचा नवीन व्हेरियंट अर्थात, ओमिक्रॉनला महाराष्ट्रापासून दूर ठेवण्यासाठी राज्य सरकार कामाला लागलंय. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी तातडीनं बोलावलेल्या राज्यमंत्रिमंडळाची बैठक नुकतीच संपली आहे. पहिल्या आणि दुसऱ्या लाटेपासून धडा घेत, ओमिक्रॉनच्या पार्श्वभूमीवर कोणती पावलं तातडीनं उचचली पाहिजेत यावर राज्यमंत्रीमंडळाच्या बैठकीत चर्चा झाल्याचं कळतंय.