Bhandara Protest: 'आता आश्वासन नको, थेट निर्णय घ्या!', Gosikhurd प्रकल्पग्रस्त आक्रमक
Continues below advertisement
भंडाऱ्यामध्ये गोसीखुर्द धरण (Gosikhurd Dam) प्रकल्पग्रस्तांचे आंदोलन आठव्या दिवशीही सुरूच असून, आंदोलक अधिकच आक्रमक झाले आहेत. प्रशासनाकडून मागण्यांकडे सातत्याने दुर्लक्ष होत असल्याने, जोपर्यंत ठोस तोडगा निघत नाही तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही, असा इशारा आंदोलकांनी दिला आहे. आपल्या मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी काही संतप्त महिलांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोरच्या झाडावर चढून आंदोलन केले, तर दुसरीकडे पालकमंत्री पंकज घोयर (Pankaj Goyer) यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर आंदोलकांनी मुंबई-कलकत्ता राष्ट्रीय महामार्ग (Mumbai-Kolkata National Highway) रोखून धरला. गेल्या अनेक वर्षांपासून पुनर्वसनाचा प्रश्न प्रलंबित असल्याने आमचा संघर्ष 'आर या पार' स्वरूपाचा आहे, अशी संतप्त भावना प्रकल्पग्रस्तांनी व्यक्त केली आहे.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement