Gopinath Munde Birth Anniversary: गोपिनाथ गडावरून समर्थकांकडून अभिवादन ABP Majha

गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीनिमित्त राज्यभरातून मुंडे समर्थक त्यांच्या समाधीचं दर्शन घेण्यासाठी गोपीनाथ गडावर पोहोचतायत. गोपीनाथ गडावर गर्दी करु नये असं आवाहन पंकजा मुंडे यांनी केलं होतं. त्यामुळे यंदा गोपीनाथ गडावर कोणताही जाहीर कार्यक्रम ठेवण्यात आलेला नाही. आजचा दिवस संकल्प दिन म्हणून पाळत पंकजा मुंडे ऊसतोड कामगारांसोबत वेळ घालवणार आहेत. तसंच रक्तदान शिबीर, कोरोना लसीकरण असे कार्यक्रमही राबवले जाणार आहेत. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola