Jaipur Accident : भरधाव डंपरने 40 वाहनांना चिरडले, भीषण अपघातात 14 ठार, 40 जखमी

Continues below advertisement
राजस्थानच्या जयपूरमध्ये (Jaipur) एका भरधाव डंपरने चाळीस वाहनांना धडक दिल्याने मोठी दुर्घटना घडली आहे, ज्यामध्ये आतापर्यंत चौदा जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण गंभीर जखमी आहेत. 'डंपर चालक दारूच्या नशेत होता,' असे आरोप प्रत्यक्षदर्शींकडून करण्यात येत आहेत. ही घटना हरमाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील लोहामंडी रस्त्यावर घडली. भरधाव डंपरने आधी एका कारला धडक दिली आणि त्यानंतर रस्त्यावरील अनेक वाहने आणि पादचाऱ्यांना चिरडत तो पुढे गेला. अपघातानंतर घटनास्थळी एकच खळबळ उडाली आणि बचावकार्य तातडीने सुरू करण्यात आले. जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या घटनेनंतर संतप्त नागरिकांनी दोषी चालकावर कठोर कारवाईची मागणी केली आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola