Gopichand Padalkar On Jayant Patil : गोपीचंद पडळकरांचं वादग्रस्त विधान, शरद पवारांचे नेते चांगलेच संतापले

Continues below advertisement
भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांच्यावर खालच्या पातळीवर टीका केली आहे. पडळकरांनी जयंत पाटील यांच्या वडिलांचा उल्लेख करत आणि त्यांच्या आईविरोधात अपशब्द वापरत टीका केली. या टीकेमुळे महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी पडळकरांच्या टीकेचा निषेध केला. नेतृत्वाच्या पाठिंब्याशिवाय असे बोलणे शक्य नाही, असे आव्हाड म्हणाले. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या विधानांना वेदना देणारी म्हटले आहे. "अशी विधानं वेदना देणारी असतात," असे अजित पवार म्हणाले. राजकारणात सुसंस्कृतपणा दाखवायला पाहिजे, असा सल्लाही त्यांनी दिला. पक्षानं याची नोंद घेऊन भूमिका स्पष्ट करावी, अशी प्रतिक्रियाही अजित पवारांनी व्यक्त केली. शशिकांत शिंदे यांनी पडळकरांच्या टीकेला बौद्धिक दिवाळखोरीचे दर्शन म्हटले. राजकारणात वैचारिक मतभेद सभ्यतेच्या चौकटीत मांडले पाहिजेत, असे शिंदे म्हणाले. अमोल कोल्हेंनी देवेंद्र फडणवीसांना टॅग करत म्हटले की, माकडाच्या हाती कोलीत दिलं आणि ते आग लावत सुटले तर त्यामध्ये दोष माकडापेक्षा कोलीत देणाऱ्याचा असतो.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola