Gopichand Padalkar on ST Workers Strike : आझाद मैदानातील आंदोलन मागे : गोपीचंद पडळकर ABP Majha

Continues below advertisement

ST Workers Strike updates :  मागील काही दिवसांपासून सुरू असलेले आंदोलन आता संपुष्टात येण्याची शक्यता आहे. राज्य सरकारने दिलेली वेतनवाढ व इतर मागण्यांवर घेतलेली भूमिका स्वागतार्ह आहे. एसटी कामगारांनी उभारलेल्या लढ्याला मोठं यश आले असल्याचे सांगत एसटी कामगारांचे आंदोलन मागे घेत असल्याची घोषणा भाजप आमदार सदाभाऊ खोत यांनी केली. पुढील निर्णय कामगारांनी घ्यावा असेही सदाभाऊ खोत यांनी म्हटले. राज्य सरकारने, एसटी महामंडळाने बुधवारी एसटी कर्मचाऱ्यांना वेतनवाढ जाहीर झाली केली होती. त्यानंतर संप मागे घेतला जाणार का याबाबत चर्चा सुरू झाली. गुरुवारी भाजप आमदार सदाभाऊ खोत आणि गोपीचंद पडळकर यांनी आंदोलनातून माघार घेत असल्याची घोषणा केली. एसटी कर्मचाऱ्यांनी उत्सुर्फपणे आंदोलन सुरू केले होते. या आंदोलनात आम्ही त्यांना पाठिंबा देण्यासाठी उतरलो होतो असे सदाभाऊ खोत यांनी म्हटले. एसटी कर्मचाऱ्यांना चांगली वेतनवाढ मिळाली आहे. त्याशिवाय या आंदोलनातील एसटी महामंडळाचे राज्य शासनात विलिनीकरण करण्याची महत्त्वाची मागणी होती. सध्या विलिनीकरणाचा मुद्दा कोर्टासमोर आहे. आंदोलनातील पहिल्या टप्प्यात मिळालेले यश मोठे असल्याचे सदाभाऊ खोत यांनी म्हटले. एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नाला न्याय देण्यासाठी आंदोलनात उतरलो होतो, असे भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी म्हटले. एसटी संप आम्ही चिघळवला असल्याचा आरोप निराधार असल्याचे त्यांनी म्हटले. एसटी कर्मचाऱ्यांच्या मागणीला न्याय देण्यासाठी विविध पातळीवर प्रयत्न करत होतो असेही पडळकर यांनी म्हटले. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram