Gopichand Padalkar Indapur : गोपीचंद पडळकरांच्या 'या' वक्तव्यानंतर आंदोलकांकडून चप्पलफेक

Continues below advertisement

इंदापुरात (Indapur) गोपीचंद पडळकरांवर (Gopichand Padalkar) चप्पलफेक करण्यात आलीये. ओबीसी (OBC) एल्गार मेळाव्यात गोपीचंद पडळकर यांनी मराठा (Maratha) समाजाविरोधात भाषण केल्यामुळे इंदापुरात मराठा समाज आक्रमक झाल्याचं पाहायला मिळंत आहे. पण आम्ही ही चप्पलफेक केली नसल्याचं स्पष्टीकरण देखील मराठा समाजाकडून देण्यात आलं आहे. गोपीचंद पडळकर यंच्यावर गुन्हा नोंद करण्याची मराठा आंदोलकांनी यावेळी मागणी केलीये. ओबीसी एल्गार मेळाव्यानंतर गोपीचंद पडळकर हे मराठा साखळी उपोषणाजवळ आले. त्यावेळी मराठा आंदोलकांनी त्यांना विरोध केला.  ज्या ठिकाणी ओबीसी एल्गार मेळावा होता त्या ठिकाणावर काही फुटावरती मराठा समाजाचे साखळी उपोषण सुरू आहे. 

दरम्यान गोपीचंद पडळकरांवर त्यांच्याच माणसांनी चप्पलफेक केल्याचं स्पष्टीकरण मराठा समाजाकडून देण्यात आलं आहे. तसेच पडळकरांचीच माणसंच आमच्यावर धावून आल्याचा आरोप मराठा समाजाकडून करण्यात आला आहे. इंदापुरात अण्णा काटे यांच्या वतीने आमरण उपोषण सुरु आहे. त्या उपोषणाला भेट देण्यासाठी पडळकर गेले असल्याची माहिती समोर आली होती. पण तिथेच दुधासाठी देखील उपोषण सुरु होते. त्यामुळे पडळकर नक्की कोणत्या उपोषणासाठी आले होते, याबाबत मात्र अद्याप संभ्रम आहे. पण आम्ही ही चप्पलफेक केली नसल्याचं मराठा समाजाने स्पष्ट केलंय. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram