Crime News: 'तुझे सोना भी देना पड़ेगा', Titwala मध्ये गँगस्टर स्टाईलने Sonar चं अपहरण, 2 लाखांची खंडणी

Continues below advertisement
टिटवाळा (Titwala) येथील खडवली (Khadavali) परिसरात गहाण ठेवलेल्या दागिन्यांवरून सोनाराचे अपहरण करून खंडणी मागितल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी सोनार उगम चौधरी (Ugam Chaudhary) यांनी पोलिसात तक्रार दिली असून, संजय पाटोळे (Sanjay Patole) आणि त्याच्या दोन साथीदारांवर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. चौधरी यांच्या म्हणण्यानुसार, आरोपींनी त्यांना गाडीत घालून मारहाण केली आणि 'दागिने फुकट दे आणि अजून दोन लाख रुपये दे अन्यथा तुला मारून दरीत फेकून देईल,' अशी धमकी दिली. चार वर्षांपूर्वी एका महिलेने चौधरी यांच्या महालक्ष्मी ज्वेलर्स दुकानात दागिने गहाण ठेवले होते. तेच दागिने परत मागण्यासाठी आलेल्या महिलेसोबत वाद झाल्यानंतर संजय पाटोळे यांनी साथीदारांसह चौधरी यांना दुकानातून उचलून नेले. त्यांना बेदम मारहाण करून दोन लाख रुपयांची खंडणी मागण्यात आली. या घटनेमुळे खडवली परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola