Gold Price : सोन्याचे भाव गगनाला मात्र, लक्ष्मीपूजनाचा मुहुर्त साधत नाशिककरांचा खरेदीचा उत्साह
Continues below advertisement
नाशिकमध्ये (Nashik) लक्ष्मीपूजनाच्या (Laxmi Pujan) मुहूर्तावर सोनं-चांदीच्या खरेदीसाठी नागरिकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली. सोन्याचे दर प्रतितोळा १,३४,००० रुपयांच्या पुढे गेले असतानाही, सणासुदीच्या खरेदीचा उत्साह लोकांमध्ये दिसून येत आहे. 'सोन्याच्या दरात तोळ्यामागे ३,३५० रुपयांची वाढ झाली आहे, तरीही नाशिककरांचा सोने खरेदीला संमिश्र प्रतिसाद मिळत आहे', असे चित्र शहरातील सराफ बाजारात आहे. अनेक ग्राहक वाढत्या किमतींमुळे चिंतेत असले तरी, परंपरेचा भाग म्हणून लहान दागिने किंवा चांदीची नाणी खरेदी करण्याकडे अनेकांचा कल होता. शहरातील 'मयूर अलंकार' यांसारख्या प्रसिद्ध सराफा दुकानांमध्ये दिवसभर ग्राहकांची वर्दळ होती. सोन्याबरोबरच चांदीचे दरही वाढले असून, गुंतवणुकीचा पर्याय म्हणून चांदीलाही मोठी पसंती मिळत आहे.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement