CoronaVirus Effect | सोन्याच्या दराची 50 हजाराच्या दिशेने वाटचाल सुरु
सोन्याच्या दरांवर कोरोना व्हायरसचा मोठा परिणाम झाल्याचं दिसतंय,...दिल्लीत सोन्याचे दर प्रतितोळा 45 हजारांवर पोहोचलेत तर महाराष्ट्रातल्या जळगावात सोन्याच्या दरांनी 44 हजार 400 इतक्या विक्रमी पातळी गाठलीए.. कोरोनामुळे जागतिक बाजार घसरलाय. आयात-निर्यातीवरील निर्बंध यामुळे गुंतवणूकदारांनी थेट सोन्यात गुंतवणूक केल्यानं सोन्याच्या दरात मोठी वाढ झालीए.. भारतीय रुपयाचीही घसरण होऊन डॉलर ची किंमत वधारल्याने त्याचाही परिणाम सोन्याच्या दरांवर झालाय.. जळगावमध्ये सोन खरेदी-विक्रीतून रोज होणारी कोट्यवधींची उलाढाल मंदावली. यासर्वाचा परिणाम ग्राहकांवर झालाय.. ग्राहकांनी सोन्याकडे पाठ फिरवली..