Gold Price Today: धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर सोनं झालं स्वस्त, सोन्याच्या दरात 3 हजारांची घसरण
Continues below advertisement
धनत्रयोदशीच्या (Dhanteras) शुभ मुहूर्तावर सोने (Gold) आणि चांदी (Silver) खरेदी करणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. सोन्याच्या दरात मोठी घसरण झाली असून, ग्राहकांना काहीसा दिलासा मिळाला आहे. धनत्रयोदशीच्या निमित्ताने सोन्याच्या दरात तीन हजार रुपयांची घसरण होऊन, जीएसटीसह (GST) सोन्याचे दर एक लाख बत्तीस हजार रुपयांवर आले आहेत. तर दुसरीकडे चांदीच्या दरातही मोठी घट झाली आहे. चांदीचा भाव आठ हजार रुपयांनी घसरल्याने, तो एक लाख अठ्ठ्याहत्तर हजार रुपयांवरून थेट एक लाख सत्तर हजार रुपयांवर पोहोचला आहे. सणासुदीच्या काळात झालेल्या या दर घसरणीमुळे सोने आणि चांदी खरेदीसाठी ग्राहकांमध्ये उत्साह दिसून येत आहे.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement