Shivaji Kardile Death: आमदार शिवाजी कर्डिलेंना अखेरचा निरोप, सांत्वनासाठी मुख्यमंत्री फडणवीस दाखल

Continues below advertisement
राहुरीचे आमदार शिवाजी कर्डिले (Shivaji Kardile) यांच्यावर अहिल्यानगरच्या (Ahilyanagar) बुऱ्हाणनगर येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis), पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) आणि विधान परिषदेचे सभापती राम शिंदे (Ram Shinde) यांनी त्यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन सांत्वन केले. कर्डिले यांचे शुक्रवारी वयाच्या ६७ व्या वर्षी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. पोलिसांच्या पथकाने हवेत बंदुकीच्या फैरी झाडून त्यांना मानवंदना दिली. कर्डिले यांचा मुलगा अक्षय याने पार्थिवाला मुखाग्नी दिला. या अंत्यसंस्काराला राजकीय, सामाजिक क्षेत्रातील अनेक मान्यवर आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola